एका अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी भारत सरकारचा खर्च २० दिवस चालवू शकतात. ४०.३ अब्ज डॉलर त्यांची संपत्ती आहे. एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर देश चालवण्याची वेळ आली, तर तो त्याच्या संपत्तीवर किती दिवस देश चालवू शकतो? असा तुलनात्मक अहवाल प्रकाशित झाला आहे. सर्वाधिक दिवसांचा विचार करता मुकेश अंबानींचा पाचवा क्रमांक लागतो. टॉप १० च्या यादीत चीनचा क्रमांक तळाला आहे. ते अवघे चारच दिवस स्वतःच्या पैशांनी सरकारचा खर्च भागवू शकतात. मुळात हा क्रम सर्वात श्रीमंत व्यक्तींनुसार नसून, त्यांची वैयक्तिक संपत्ती आणि त्या-त्या देशाचा एका दिवसाचा राष्ट्रीय खर्च यांच्या ताळमेळीवर अवलंबून आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews